Hashtagintro

Trimbakeshwar Temple Security | त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांकडून सुरक्षाक्षक महिलेला मारहाण

त्र्यंबकेश्वर (पुढारी वृत्तसेवा):

दिवाळी सुटीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी उरलेली असून, भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन दर्शनासाठी भक्तांना लागलेला वेळ त्यांच्या सोशिकतेची परीक्षा पाहणारा ठरत आहे. याचे पर्यावसन हाणामारीत होत आहे. बुधवारी (दि. ११) सकाळी गर्भगृहासमोर येणाऱ्या दोन भाविकांना महिला सुरक्षाक्षकाने बाजूला करीत बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागारातून महिला सुरक्षाक्षकांसमवेत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत संबंधित महिला सुरक्षाक्षकाने त्र्यंबक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ च्या दरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले असते.

मात्र, त्यात तीन वेळा नैवेद्यासाठी दरवेळी अर्धा तास गर्भगृह दरवाजा बंद असतो. त्यामुळे दर्शनबारी थांबवली जाते. सशुल्क पास २०० रुपये दर्शनबारी उत्तर दरवाजाने आत येते. त्यामुळे पूर्व दरवाजाकडील भाविक थांबवले जातात.

व्हीआयपीरांगेतील भाविकांच्या दर्शनासाठी होणाऱ्या विलंबावर परिणाम करणारे आहेत.
त्र्यंबकेश्वर देवस्थान सभामंडळातील घटनेबाबत दोन्ही बाजूंची चौकशी होऊन सत्य समोर यावे. घटनेबाबत एकाच बाजूचे म्हणणे ऐकून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर यांनी म्हटले आहे. तातडीचे दर्शन २,५०० रुपये पावती सुरू केल्याने त्याचादेखील परिणाम रांगेतील भाविकांच्या दर्शन वेळेवर होतो.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language