Hashtagintro

US plane crash : अमेरिकेत निवासी भागात खासगी विमान कोसळले; 9 जणांचा मृत्यू, आगीमुळे परिसरात खळबळ

US plane crash: अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील पाम बीच काउंटीमधील ग्रीनएकर्स परिसरात रविवारी दुपारी भीषण विमान अपघात झाला. 9 जणांना घेऊन जाणारे लियरजेट 60 हे व्यावसायिक विमान निवासी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी दिली. ( US plane crash)
टेक्सासहून बहामासकडे जात होते विमान
मिळालेल्या माहितीनुसार, N722BD या नोंदणी क्रमांकाचे हे विमान LR60271 LLC या कंपनीद्वारे चालवले जात होते. विमानाने टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. ते बहामासमधील नॉर्थ एल्युथेरा विमानतळाकडे जात होते.

स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे 12:50 वाजता मिलिटरी ट्रेलजवळील एका मोबाइल होम कम्युनिटीच्या परिसरात विमान कोसळले. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, विमान सुमारे 35,000 फूट उंचीवरून अचानक वेगाने खाली येत होते. मात्र, विमानाचा वेगाने खाली येण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धडकेनंतर भीषण आग; घरांचेही नुकसान
विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि परिसरात आग पसरली. धडकेमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला, तर विमानाचे अवशेष परिसरात विखुरले गेले. या दुर्घटनेत एका मोबाइल होमचे नुकसान झाले. तसेच वीजवाहिन्या तुटल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

WATCH: New video shows Learjet 60 business jet crashing near West Palm Beach, Florida.
The plane was completely disintegrated upon impact. Number of casualties unknown. https://t.co/l5JT9KEWnQ

— BNO News (@BNONews) November 1, 2026

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये विमान वेगाने जमिनीकडे येताना आणि धडकेनंतर आगीचा मोठा लोळ उठताना दिसत आहे. काही डॅशकॅम फुटेजमध्ये अपघाताचा क्षण कैद झाला आहे. घटनास्थळावरून दाट काळा धूर उठत असल्याचेही व्हिडिओंमध्ये दिसते.
FAA आणि NTSB कडून तपास सुरू
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अमेरिकेची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) तपास करत आहेत. अपघातस्थळ पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मैलांच्या अंतरावर आहे.

दरम्यान, मृत्यू झालेल्या 9 जणांची ओळख अधिकाऱ्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच विमान कोसळण्यामागील तांत्रिक बिघाड, हवामान किंवा अन्य कारणांबाबतही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language