Hashtagintro

Vastu Tips | घरात लावा हे ५ फोटो; वास्तुशास्त्रानुसार मिळेल सुख-समृद्धी!

घराच्या सजावटीमध्ये चित्रांना विशेष महत्त्व असते. सुंदर चित्रांमुळे घराच्या सौंदर्यात भर पडते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते

काही जण महागडी आणि प्रसिद्ध चित्रे खरेदी करण्यास पसंती देतात, तर काही जण आपल्या आवडीनुसार बाजारात उपलब्ध असलेली चित्रे घरात लावतात

वास्तुशास्त्रानुसार काही चित्रे घरात लावणे शुभ मानले जाते. या चित्रांमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यासोबतच सुख, समृद्धी, प्रेम आणि सौभाग्य लाभते

वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. घोडे हे वेग, यश, सामर्थ्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात. हे चित्र घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावे

धबधब्याचे चित्र घरात लावल्याने प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण होते, असे वास्तुशास्त्रात मानले जाते. या चित्रामुळे जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण होण्यास मदत होते, अशी धारणा आहे

श्रीगणेशांचे चित्र घरात लावणे शुभ मानले जाते. श्रीगणेश हे विघ्नहर्ता असून त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, अशी श्रद्धा आहे

निसर्गप्रेमींसाठी पर्वतांचे चित्र आकर्षक ठरतेच; शिवाय वास्तुशास्त्रानुसार हे चित्र स्थैर्य आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. घराच्या नैऋत्य, ईशान्य आणि पूर्व दिशेला हे चित्र लावता येते

मोराचे चित्र घराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. मोराच्या आकर्षक रंगांमुळे घरातील सजावटीला एक वेगळीच शोभा येते. मोर हे चैतन्य, समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक मानले जातात

येथे क्लिक करा

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language