Hashtagintro

World stroke day: रात्रीच्या उशीरा जेवल्याने देखील वाढतो ब्रेन स्ट्रोकचा धोका ? डॉक्टरांचे म्हणणे काय?

World stroke day: रात्रीच्या उशीरा जेवल्याने देखील वाढतो ब्रेन स्ट्रोकचा धोका ? डॉक्टरांचे म्हणणे काय?

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रात्री उशीरा जेवणे आणि उशीरा झोपणे सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. परंतू याचा थेट परिणाम तुमच्या ब्रेनवर देखील पडू शकतो. आणि हे ब्रेन स्ट्रोकच्या रिस्कशी संबंधित असू शकते. २९ ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जात आहे. डॉक्टरचे म्हणणे आहे रोजच्या चुकीच्या सवयी, उशीरा जेवणे आणि कमी झोप देखील मेंदूचे आरोग्य खराब करु शकते.

मेट्रो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या सिनिअर न्यूरोलॉजिस्ट डॉ. सोनिया लाल गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या मते आपल्या शरीरात सर्केडियन रिदम असते. ही झोप, हार्मोन, बीपी नियंत्रण करण्यात महत्वाची भूमिका निभावते. जेव्हा एखादा व्यक्ती रात्री उशीराचे भोजन करतो, तेव्हा झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदलते. यामुळे सर्केडियन रिदमवर परिणाम होतो.

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित एका संशोधनात देखील या गोष्टीचा उल्लेख केला आहे. यात एक लाखाहून अधिक लोकांवर रिसर्च केला आहे. यात रात्री १० वाजल्यानंतर भोजन करणारे लोकांमध्ये रात्री ८ वाजण्याच्या आधी जेवण करण्याच्या तुलनेत सेरेब्रोवॅस्कुलर आजाराचा रिस्क २८ टक्के जास्त आढळला आहे. सेरेब्रोवॅस्कुलर आजारामुळे ब्रेन स्ट्रोक येतो. संशोधनातून हे स्पष्ट होते की उशीरा जेवल्याने आणि झोप पूर्ण न झाल्याने मेंदूचे आरोग्य खराब होते. त्यामुळे अशात हे गरजेचे आहे की जेवणाच्या वेळेत सुधारणा करावी.

जेवणाची वेळ कशी सुधारावी ?

आरोग्यदायी राहाण्यासाठी जेवणाची योग्य वेळ राखणे आणि झोपण्याआधी पचायला जड असलेला आहार करु नये. रात्री झोपण्याआधी जेवण अशा वेळी खावे की पचायला पुरेसा वेळ मिळेल. मात्र, याची निश्चित अशी वेळ नाही, ज्यामुळे स्ट्रोकपासून बचावाची गॅरंटी मिळेल. परंतू तुम्ही रात्री दहाच्या नंतर जेवण करणे टाळावे. खास करुन चिप्स, बर्गर, रेड मीट आणि मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांना रात्री सेवन करु नये.

स्ट्रोकची लक्षणे ओळखणे गरजेचे

आहारातील सुधारणे बरोबर ब्लड प्रेशरची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे असते. जर बीपी नियंत्रणात असेल तर ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी रहातो. याच सोबत ब्रेन स्ट्रोकच्या लक्षणांना देखील ओळखता आले पाहिजे. चेहरा अचानक एका बाजूला वाकडा होणे, शरीर एका बाजूला कमजोर पडणे, सुन्नपणा, बोलताना अडखळायला होणे, अचानक दिसण्यास अडचण होणे, ही सर्व ब्रेन स्ट्रोकची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसतील तर लागलीच रुग्णालयात जाणे गरजेचे असते.

 

Source: TV9 Marathi Health

Read full article on TV9 Marathi Health

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language