
आयर्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू आणि यशस्वी लेग-स्पिनर बेन व्हाईटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. बेन व्हाईट फक्त २८ वर्षांचा असून तो आयर्लंड संघाचा एक महत्त्वाचा सदस्य होता. त्याचा शेवटचा सामना डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेशविरुद्ध झाला होता, जो आयर्लंडने जिंकला होता. बेन व्हाईटने २०२१ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळला.
बेन व्हाईटला आयर्लंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे आणि तो तीन टी-२० विश्वचषकांमध्ये संघाचा भाग होता. आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दलच्या निवेदनात बेन म्हणाला, “माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळण्याचे माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिल्याबद्दल मी क्रिकेट आयर्लंडचे आभार मानू इच्छितो. तीन आयसीसी टी-२० विश्वचषकांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व करणे आणि कसोटी क्रिकेट खेळणे, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.” पण मला याचा नेहमीच खूप अभिमान वाटेल आणि या प्रवासात मिळालेल्या अनुभवांसाठी आणि आठवणींसाठी मी कृतज्ञ राहीन. व्हाइटने २०२१, २०२४ आणि २०२६ या तीन टी२० विश्वचषकांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. बेन व्हाईटने जुलै २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले. त्याने आयर्लंडसाठी ३८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून ३६ बळी घेतले.
Ben White doing Ben White things!
41 wickets for Ireland. Here are a few of our favourites.
#BackingGreen https://t.co/09Y0ZKWoXD
— Cricket Ireland (@cricketireland) October 28, 2026
लेग-स्पिनर बेन व्हाइटने आयर्लंडसाठी ४३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात ३ कसोटी, २ एकदिवसीय आणि ३८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. व्हाइटने कसोटीत चार आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त एक बळी घेतला. त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने २७.३८ च्या सरासरीने ३६ बळी घेतले. आयर्लंड संघाच्या प्रशिक्षकानेही व्हाइटच्या निवृत्तीबाबत एक निवेदन जारी केले, ज्यात म्हटले आहे की, “मी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याने आपल्या देशासाठी ४० हून अधिक सामने खेळले याचा मला आनंद आहे आणि संघात त्याची उणीव नक्कीच भासेल.”
Source: TV9 Marathi Sports

