Hashtagintro

Madhuri Dixit: माधुरी दीक्षित आज असती राजघराण्याची सून, तब्बल 1420 कोटींची मालकीण, पण बिनसलं कुठे?

Madhuri Dixit: माधुरी दीक्षित आज असती राजघराण्याची सून, तब्बल 1420 कोटींची मालकीण, पण बिनसलं कुठे?

Madhuri Dixit And Ajay Jadeja: क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे खूप जुने नाते आहे. अनेक क्रिकेटपटूंचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत संबंध होते. यापैकी काही संबंध लग्नापर्यंत पोहोचले. असेही काही संबंध होते ज्यात प्रेम होते, पण ते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाहीत. अनेक अफेअर इतके गाजले की ते आजही लोकांच्या लक्षात तितकेच आहेत. या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांचेही नाव येते.

माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची भेट एका मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान झाली. सुरुवातीला ते मित्र बनले, नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि हळूहळू त्यांचे प्रेम फुलले. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  माधुरी दीक्षितसोबतच्या संबंधांमुळे अजय जडेजाच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. अजय जडेजाचा खेळ खालावला आणि त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ लागला. १९९९ मध्ये, मॅच-फिक्सिंगमध्ये अजय जडेजाचे नाव समोर आले. या प्रकरणात बीसीसीआयने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली. या प्रकरणी देशभरात अजय जडेजाचे पुतळे जाळण्यात आले. माधुरी दीक्षितच्या कुटुंबानेही या संबंधांना मान्यता दिली नाही. माधुरी दीक्षितने अजय जडेजासोबतचे नाते तोडले आणि डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्यासाठी ती अमेरिकेला गेली. अजय जडेजाने राजकारणी जया जेटली यांची मुलगी अदिती जेटली हिच्याशी लग्न केले.

जवळपास दोन वर्षांपूर्वी गुजरातच्या जामनगरच्या माजी राजघराण्याचे भाचे आणि माजी क्रिकेटपटू शत्रुशल्य सिंह यांचे उत्तराधिकारी म्हणून अजय जडेजाची घोषणा करण्यात आली. अजय जामसाहेब बनला आहे. जामसाहब बनताच ₹१,४२० कोटीचा अजय जडेजा हा मालक बनला. एका झटक्यात कोट्यवधींचा मालक अजय जडेजा बनला.

 

जर आज माधुरी आणि अजय जडेजा यांचे नाते आधीसारखेच असते. या दोघांचे लग्न झाले असते तर अर्थात माधुरी आज या राजघराण्याची शुन असती. तर या १४२० कोटींची मालकीण ही असती. पण माधुरीने वेगळा रस्ता निवडला आणि तिने डॉ. नेनेंशी लग्न केले. आज या जोडप्याला दोन मुलेही आहेत.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language