Hashtagintro

पहिला चहा | सह्याद्रीचे मनोगत

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,

पक्षीही सुस्वरे आळविती…

हा संत तुकारामांचा अभंग आपण विसरत चाललो आहे की काय… कारणही तसेच आहे. सह्याद्रीच्या छाताडावर विविध प्रकल्प येऊ घातले आहेत. प्रोजेक्ट उभारले जात आहेत. आणि त्यासाठी कित्येक एकर जंगलातील वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. ५०-१००-२०० वर्षांहून अधिक काळापासून असलेली झाडे आज नामशेष होऊ पाहात आहे. अशावेळी एक कडवे आवर्जून आठवते.

‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभु राजा

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा…’

छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्याची, इतिहासाची आणि स्वराज्याची गाथा आणि त्यांच्या जयघोषासाठी हे काव्य आणि त्यात सह्याद्रीचा उल्लेख गौरवोद्‌गार म्हणून कवी राजा नीळकंठ बढे यांनी केला आहे आणि आज त्याच सह्याद्रीला एका सिंहाची गरज आहे. सह्याद्रीतील वृक्षांची राजरोस होत असलेली कत्तल थांबली पाहिजे. विकास, विकास करत आपण शेखचिल्ली झालो आहोत की काय… कारण, ज्या झाडावर आपण बसत आहोत, त्याच झाडाची फांदी आपण तोडत आहोत.

सध्या जगात ठिकठिकाणी ‘अल निनो’ इफेक्ट दिसून येत आहे. दुष्काळी संकटाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे आपण जर बेधडक वृक्षांची कत्तल करत गेलो तर संकट अजूनच मोठं रूप धारण करेल. त्या मुक्या जनावरांचे काय, ज्यांची घरे या सह्याद्रीच्या कुशीत आहेत. विचार करा. आपले घर जर कुणी बॉम्ब लावून उडवून दिले, तर आपली काय अवस्था होईल. तशीच या प्राण्यांची अवस्था होत असेल. ‘प्रकृती सुरक्षित, तर आपण सुरक्षित’ हे ब्रीद वाक्य आपण लक्षात ठेवले पाहिजे. कुणीतरी झाडाचे मत व्यतीत करणारी एक सुंदर कविता लिहिली आहे…

खामोश सा खडा था वो पेड

अपने जख्मों को दिल में दबाए हुए

इन्सानों की भीड में अकेला

अपनी ही छाँव मे आँसू छुपाएँ हुए

पुछा मैने हवा से कभी रुक कर

क्यो उदास है ये धरती का आँचल

हवा बोली-इन्सान ने स्वार्थ के खातीर

छीन लिया इसका हर एक पल…

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language