Hashtagintro

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, तिथे कोणताही विलंब न करता तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, असे स्पष्ट आदेश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. इतकेच नव्हे तर, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पाणीटंचाईच्या बातम्यांचीही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, संबंधित गावात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी आणि गरज भासल्यास तात्काळ टँकर सुरू करावेत, अशा सूचनाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत. इतकंच काय तर ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटले आहेत किंवा पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तिथे टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे आणि गरजेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्यावर घोंघावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला कंबर कसण्याचे आणि ठोस नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ अंदाजांवर विसंबून न राहता पावसाचे एकूण प्रमाण, खालावलेली भूजल पातळी, विहिरींची सद्यस्थिती आणि धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून टंचाईग्रस्त गावांची यादी तातडीने निश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/20/information-on-cash-transactions-exceeding-two-lakh-rupees-will-now-be-shared-with-the-income-tax-department-decision-taken-by-the-revenue-department/
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाणीपुरवठा विभागाने परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर नियमित देखरेख ठेवावी आणि कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाईसंदर्भात माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासकीय प्रक्रियेत विलंब न करता तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language