Hashtagintro

Mahavitaran : महावितरणची राज्यभरात मोठी कारवाई, 3 दिवसांत 250 वीजचोरीची प्रकरणे उघड, 6.27 कोटींचा गैरवापर उघड

मुंबई  : राज्यात वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अवघ्या 3 दिवसांत वीजचोरीची 250 प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत एकूण 6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी राज्यातील विविध भागांत तपासणी करून ही कारवाई केली.
https://www.prahaar.in/2026/11/20/transfers-of-four-senior-ias-officers-in-the-state/
कोकणात 53, तर पुण्यात 73 प्रकरणे
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रादेशिक विभागांत तपासणी केली. त्यामध्ये सर्वाधिक 73 प्रकरणे पुणे विभागात आढळली. तर इतर विभागांतील कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

कोकण विभाग – 53 प्रकरणे
पुणे विभाग – 73 प्रकरणे
छत्रपती संभाजीनगर विभाग – 56 प्रकरणे
नागपूर विभाग – 68 प्रकरणे

या सर्व प्रकरणांचे मूल्यांकन करण्यात आले असून संबंधित ग्राहकांना 6 कोटी 27 लाख रुपयांची वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत. निर्धारित मुदतीत बिल आणि दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

240 जणांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई
या मोहिमेत 240 ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा 2003 मधील कलम 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे कलम वीजचोरीशी संबंधित आहे. तर अनधिकृत वीज वापराच्या 2 प्रकरणांत कलम 126 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
वीजचोरीचे बिल आणि दंडाची रक्कम विहित मुदतीत न भरणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद दिली जाणार आहे. विद्युत कायद्यानुसार वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.

थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांचीही तपासणी
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीजजोडण्यांचीही सध्या तपासणी सुरू आहे. ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language