Hashtagintro

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी बातमी! 22 डिसेंबरला अंतिम मतदार यादी; निवडणूक आयोगाने जाहीर केले नवे वेळापत्रक

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात (SIR-2026) भारतीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. 17 नोव्हेंबर 2026 रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्रासह 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील SIR प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ASDD मतदारांच्या गणना अर्जांसंदर्भातही महत्त्वाचे वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार 18 नोव्हेंबर 2026 पर्यंत गणना अर्जांची निर्मिती आणि छपाई पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 18 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत अर्जांचे वितरण आणि संकलन केले जाणार आहे. तर 10 डिसेंबर 2026 पर्यंत गणना अर्जांचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रासाठी SIR प्रक्रियेचे नवे वेळापत्रक
निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेसाठी 31 ऑगस्ट 2026 ते 15 डिसेंबर 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, दिल्ली, नागालँड, तेलंगणा, हरियाणा आणि झारखंड या राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 22 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/17/draft-electoral-roll-for-uttar-pradesh-released-final-list-to-be-published-on-january-4/
राजकीय पक्षांनाही कळवणार सुधारित वेळापत्रक
निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आणि प्रशासकीय यंत्रणांना या निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ASDD मतदारांच्या गणना प्रक्रियेची आणि SIR-2026 च्या सुधारित वेळापत्रकाची सर्व उपलब्ध माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यास सांगितले आहे. राजकीय पक्षांनाही या बदललेल्या वेळापत्रकाची लेखी स्वरूपात माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेला आता वेग येणार असून, 22 डिसेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language