
चीनने भारतासोबत बॉर्डवर सुरू असलेल्या तणावावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भारत -चीन बॉर्डवर नुकताच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. याची संपूर्ण देशात चर्चा देखील झाली. या तणावानंतर आता चीनकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जियाकुन यांनी सोमवारी म्हटलं की, आमचे सौनिक सीमेवर फक्त पेट्रोलिंग करतात. आमच्या सैन्यांना पूर्ण नियम माहिती आहेत, आणि ते नियमांचं पालन देखील करतात. आम्ही भारताकडून देखील अशीच अपेक्षा करतो विशेष म्हणजे आयटीबीपीचे डीजी शत्रुजीत कपूर यांच्या वक्तव्यानंतर तणावासंदर्भातील बातम्या समोर आल्या होत्या.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं?
ग्लोबल टाइम्स ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जियाकुन यांनी सोमवारी म्हटलं की आमचे सौनिक सीमेवर फक्त पेट्रोलिंग करतात, आमच्या सौनिकांकडून भारत आणि चीन दरम्यान जो करार झाला आहे, त्या करारामधील अटींचं सक्तीने पालन केलं जात आहे. चीन सौनिक प्रादेशिक सार्वभौमत्व आणि सीमेवरील स्थिरता राखण्यासाठी नियमितपणे पेट्रोलिगं करत असतात, तसेच या भागाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहे. आम्ही भारताकडून देखील अशीच अपेक्षा करतो, भारतासोबत राजनौतिक संवादाचा मार्ग नेहमी खुला राहील, भारत देखील दोन्ही देशांमध्ये झालेल्या करामधील नियमांचं पालन करेल अशी आम्हाला आशा आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. भारत सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी सहकार्य करेल, असं आम्हाला वाटतं असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
आयटीबीपीचे डीजी शत्रुजीत कपूर यांनी भारत -चीन बॉर्डर संदर्भात नुकतीच महत्त्वाची माहिती दिली होती. दोन्ही देशांदरम्यान अरुणाचल प्रदेश बॉर्डवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तणाव निर्माण झाला असताना भारतीय जवांनी खूप जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली, शत्रूंचा सामना केला, असं त्यांनी म्हटले होतं, यानंतर विरोधी पक्षांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न करण्यात आला.
Source: TV9 Marathi International
