Hashtagintro

Beed News: बाप तुरुंगात, आता लेकाचीही जिरवली, वाल्मिक कराडच्या मुलाला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

Beed News: बाप तुरुंगात, आता लेकाचीही जिरवली, वाल्मिक कराडच्या मुलाला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

Beed Sushil Karad News:  बीडच्या मस्सजोगचे सरपंच, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सुशील कराडविरोधात एका महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, सुशील कराड याच्याविरोधात भारतीय न्याय दंड संहितेच्या विविध 14 कलमाअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले होते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आलेल्या या तक्रारीमध्ये पॉक्सोचाही गंभीर गुन्हा होता. सोलापूर येथे एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुशील कराड याच्यावर २०२४ मध्ये घडलेला प्रकार महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवणे, महिला, तिचा पती आणि अल्पवयीन मुलीला मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न करणे, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे, प्लॉट, दोन बल्कर ट्रक, दोन कार, सोन्याचे दागिने बळजबरीने हडप करणे, कोऱ्या बॉण्ड तसेच चेकवर सह्या घेणे असे आरोप आहेत.

सुशील कराडवर गंभीर आरोप!

याप्रकरणी महिलेने सुशील कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलेने यापूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाच्या हस्तक्षेपाने सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशातत आता या गंभीर गुन्ह्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सुशील कराडचा शस्त्र परवाना रद्द केला आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language