Hashtagintro

Beed News | वायू सेनेचे जवान गोविंद नेहरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, चारचाकीने धडक दिल्याने अपघाती मृत्‍यू!

गेवराई : भारतीय वायू सेना दलात नायक पदावर कार्यरत असलेले गोविंद भागवत नेहरकर (वय ३२, रा. वडगाव ढोक, ता. गेवराई) यांचा चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत गंभीर अपघात झाला. उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहा वाजता वडगाव ढोक येथील शेतात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून शोक सलामी देत वीर जवानाला अखेरची मानवंदना देण्यात आली.

त्यांना बीड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बीड जिल्हा पोलीसांच्या वतीने हवेत तीन राऊंड फायर करून शोक सलामी देण्यात आली. तसेच, पुणे येथील भारतीय वायू सेना दलाच्या वतीने नायक ऋषीकेश कदम, नायक मनप्रीत, उपविभागीय अधिकारी शुभम पवार, गेवराई चे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे, निवृत सैनिक लेफ्टनंट त्रिंबक तिपाले, आनंद पिंपळे, प्रा. लक्ष्मण हाके, रणवीर पंडित, यशराज पंडित यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

गोविंद नेहरकर हे मागील बारा वर्षांपासून भारतीय वायू सेना दलात सेवा बजावत होते. सध्या ते बेळगाव येथे नायक पदावर कार्यरत होते. दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त ते सुट्टीवर गावी आले होते. शुक्रवारी (दि. १३) रात्री नऊच्या सुमारास गढी तालुका गेवराई येथील वळण रस्त्याजवळून दुचाकीवरून घरी जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language