Hashtagintro

Chanakya Niti : या तिघांना कधीच झोपेतून उठवू नका, …तर होऊ शकतो मृत्यू

Chanakya Niti : या तिघांना कधीच झोपेतून उठवू नका, …तर होऊ शकतो मृत्यू

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे,  ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात काही माणसं अशी असताना ते झोपलेले असताना त्यांना कधीही झोपेतून उठवण्याची चूक करू नये. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राजा –  आर्य चाणक्य म्हणतात राजाला कधीही झोपेतून उठवण्याची चूक करू नका, जर राजा झोपला असेल तर त्याला शांत झोपू द्या. कारण तुम्ही जर राजाला झोपेतून उठवण्याची चूक केली तर त्याला कदाचित राग देखील येऊ शकतो. राजाला राग आला तर तो तुम्हाला शिक्षा करू शकतो, कदाचित तो तुम्हाला मृत्यूदंड देखील देऊ शकतो. त्यामुळे कधीही राजाला झोपेतून जागं करण्याची चूक करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

लहान मुलं – चाणक्य म्हणतात जेव्हा लहान मुलं झोपेत असतं तेव्हा त्याला झोपेतून उठवण्याची चूक करू नका, कारण लहान मुलाची झोप जर पूर्ण झाली नाही, तर ते सतत चिडचिड करणार, त्याला सांभाळण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो. तुम्ही तुमची काम करू शकणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सिंह – चाणक्य म्हणतात सिंह जर झोपेलेला असेल तर त्याला झेपेतून जागं करण्याची चूक कधीच करू नका. कारण जर तुम्ही सिंहाला जागं करण्याची चूक केली तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे सिंहाला झोपेतून जागं करण्याची चूक करू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language