Hashtagintro

IND vs NZ: टीम इंडियाला न्यूझीलंड मालिकेपूर्वी धक्का! प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी?

IND vs NZ: टीम इंडियाला न्यूझीलंड मालिकेपूर्वी धक्का! प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी?

न्यूझीलंडमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. यामुळे तो ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाही. यानंतर आता संघाचं टेन्शन वाढलं आहे. मात्र बीसीसीआय त्याच्या जागी एका धुरंधर खेळाडूवर विश्वास दाखवू शकते. त्याचे नाव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कृष्णा एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त आहे. प्रसिद्ध कृष्णाला ३० सप्टेंबर रोजी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. २२ ऑक्टोबर रोजी त्याने सामन्याचा सराव केला. ज्यात त्याने चांगली कामगिरी केली. मात्र आता असे वृत्त आहे की तो एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. यानंतर आता संघाच्या अडचणी वाढल्या होता. मात्र यावर नवीन खेळाडूला संधी देण्यात येणार आहे.

वेगवान गोलंदाज आकिब नबी एकदिवसीय संघात प्रसिद्ध कृष्णाची जागा घेण्याची शक्यता आहे. नबी सध्या न्यूझीलंडमध्ये आहे, तो भारत ‘अ’ संघाकडून एक अनधिकृत कसोटी सामना खेळत आहे. आकिब नबीने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध शानदार गोलंदाजी करत सहा बळी घेतले. त्याने एक एकदिवसीय सामनाही खेळला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नाही. त्याला या दौऱ्यासाठी संधी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ आणखी दोन टी-२० सामने खेळणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीच टी-२० मालिका जिंकली आहे. टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघ पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकमेकांविरुद्ध खेळतील.

पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये, तर तिसरा सामना १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल. चौथा आणि पाचवा एकदिवसीय सामना अनुक्रमे १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी माउंट मौंगानुई (टॉरंगा) येथील बे ओव्हलवर खेळला जाईल.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language