Hashtagintro

IND vs NZ : पंतची साथ मिळाली नाही, पण गिल कंबोजच्या पाठिशी उभा राहिला, शेवटी निर्णय..मग मैदानातच भारतीय कॅप्टन जोरदार नाचला VIDEO

IND vs NZ : पंतची साथ मिळाली नाही, पण गिल कंबोजच्या पाठिशी उभा राहिला, शेवटी निर्णय..मग मैदानातच भारतीय कॅप्टन जोरदार नाचला VIDEO

टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलने बेसिन रिजर्व मैदानाच्या मधोमध उभं राहून चक्क डान्स केला. गिलचा हा डान्स पाहून विराट कोहलीची आठवण आली. कारण विराटला मैदानावर असा डान्स करायची सवय आहे. वेलिंगटन टेस्ट मॅच मध्ये शुबमन गिलचा हा डान्सचा अंदाज प्रत्येकाचं मन जिंकून घेईल. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये बेसिन रिजर्ववर कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा पाचवा दिवस असून टीम इंडियाला विजयाची संधी आहे. शुबमन गिलच्या डान्सने सर्वांचं मन जिंकून घेतलं. पण तो क्षण काय होता?. वेलिंग्टन टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवशी भारताने न्यूझीलंडची पाचवी विकेट काढली. अंशुल कंबोजने टॉम ब्लंडला बाद केलं. न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगच्या 77 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ही विकेट मिळाली.

टॉम ब्लंडल विरोधात टीम इंडियाने कॅच आऊटचं जोरदार अपील केलं. पण हे अपील करताना पंतची साथ मिळाली नाही. कारण पंतला अंदाजच आला नाही. फिल्ड अंपायरने हे अपील नाकारलं. पण कंबोजला विश्वास होता. कॅप्टनने गिलने त्याच्यावर विश्वास दाखवला. कॅप्टन म्हणून गिल अंशुल कंबोजला जे वाटतय, त्याच्यासोबत उभा राहिला. त्याने DRS घेतला आणि फिल्ड अंपायरचा निर्णय पलटला. थर्ड अंपायरने पाहिलं की, चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये सामावला आहे. अशा तऱ्हेने टॉम ब्लंडला यष्टीपाठी कॅचआऊट झाला. भारताला पाचवी विकेट मिळाली.

ब्लंडलने मैदानात ठाण मांडलं होतं

भारतीय कर्णधार शुबमन गिलचा अंदाज अचूक ठरला. पाचवी विकेट मिळाल्याचा आनंद गिलने डान्स करुन सेलिब्रेट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

टॉम ब्लंडलने मैदानात ठाण मांडलं होतं. हा विकेट भारतासाठी महत्वाचा होता. त्याने 54 चेंडूत 15 धावा केल्या. भारताच्या विजयाच्या मार्गात ब्लंडल एक अडथळा बनून उभा राहिलेला. त्याची विकेट काढून अंशुल कंबोजने दुसऱ्या इनिंगमधला पहिला विकेट काढला.

 

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language