Hashtagintro

IND vs NZ T20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, कॅप्टन श्रेयस अय्यरने संघाला स्पष्ट शब्दात सुनावलं, कारणं जर दिलात तर…

IND vs NZ T20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, कॅप्टन श्रेयस अय्यरने संघाला स्पष्ट शब्दात सुनावलं, कारणं जर दिलात तर…

IND vs NZ Series: भारत न्यूझीलंड यांच्यात मालिका रंगणार आहे. टी-२०, वनडे आणि कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. आता या मालिकेपूर्वीच कर्णधार श्रेयस अय्यरने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने न्यूझीलंडला पोहोचताच आता सामन्यापूर्वी भारतीय संघाला सल्ला दिला आहे.

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की,”कारणं देण्यापेक्षा संघ जिंकण्याचा मार्ग शोधेल. परिस्थितीत सामना कसा करायचा आणि सामना कसा जिंकायचा यावर ड्रेसिंग रूममध्ये चर्चा सुरू आहे. वेळापत्रक ही खूप व्यस्त आहे, पण ड्रेसिंग रुममध्ये सामना जिंकण्याची आम्ही चर्चा करतो.  सातत्याने क्रिकेट खेळण्यासोबतच नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हा खेळाचाच एक भाग आहे. न्यूझीलंडमधील परिस्थिती पूर्णपणे अनोळखी नाही. इंग्लंडमध्ये खेळण्याचे उदाहरण देत तो म्हणाला की, तिथेही परिस्थितीनुसार खेळपट्ट्या तयार केल्या जातात.  कोणत्याही दिवशी खेळपट्टी कशी मूव्हमेंट करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.”

“संघ शक्य तितक्या लवकर परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. सराव सत्रानंतर खेळाडूंना खेळपट्टी आणि परिस्थितीची अधिक चांगली कल्पना येईल, ज्याच्या आधारे ते आपली रणनीती आखू शकतील. भुवनेश्वर गोलंदाजीच्या अनुभवाची उणीव भरून काढेल. आयपीएलनंतर संघात अनेक नवीन गोलंदाज सामील झाले आहेत. अशा परिस्थितीत भुवनेश्वरचा अनुभव संघासाठी निर्णायक ठरेल. घरच्या मैदानावर खेळणे न्यूझीलंडसाठी फायद्याचे ठरू शकते. यजमान संघाला विविध मैदानांची आणि परिस्थितीची अधिक चांगली माहिती असते. हा फरक सामन्यात निर्णायक भूमिका बजावू शकतो.” असं अय्यरने कबूल केले.

“निवडीसाठी वाढत्या स्पर्धा म्हणजे चांगली डोकेदुखी. खेळाडूंनी संघाच्या गरजेनुसार आपली भूमिका पार पाडली पाहिजे. सध्याच्या संघात, ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे मला वरच्या क्रमांकावर बढती देण्याची गरज नाही. मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि हा निर्णय सामन्याची परिस्थिती आणि संघाच्या गरजेनुसार घेतला जाईल. ” अय्यर म्हणाला.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language