Hashtagintro

Israel Election Update : नेतान्याहू यांना निवडणुकीत मोठा दणका, थेट पंतप्रधानपद…सत्तेत येण्यासाठी पडद्यामागे नवा प्लॅन!

Israel Election Update : नेतान्याहू यांना निवडणुकीत मोठा दणका, थेट पंतप्रधानपद…सत्तेत येण्यासाठी पडद्यामागे नवा प्लॅन!

Israel Election Update : इस्रायलमध्ये क्नेसेट या सर्वोच्च कायदेमंडळाची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी मतदान झाले असून लवकरच निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सत्ता स्थापन करण्यासाठी येथे राजकीय घडामोडींना वेग आलाय. आपल्याला बहुमत मिळणार नाही, हे लक्षात येताच विद्यमान पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी अन्य पक्षांशी युती करून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या देशात लवकरच मोठा निर्णय होऊन नवी आघाडी जन्मास येण्याची शक्यता आहे.

इस्रायलमध्ये नेमकं काय घडतंय?

इस्रायलमध्ये 28 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणउकीत नेतान्याहू यांचा लिकूड पक्ष आणि इस्रायलचे माजी लाष्करप्रमुख गाडी आयसेनकोट यांनी स्थापन केलेल्या शयर या दोन पक्षांत प्रमुख लढत झाली. या ठिकाणी एकूण 120 जागांसाठी मतदान पार पडले. त्यामुळे सत्ता स्थापन करायची असेल तर 61 जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे. परंतु नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता धूसर आहे. म्हणूनच नेतान्याहू यांनी नवी आघाडी स्थापन करून सत्तेत काय राहण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

नेतान्याहू नेमका काय डाव टाकत आहेत?

प्राथमिक अंदाजानुसार नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला एकूण 53 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आयसेनकोट यांच्या पक्षाला 48 जागा मिळू शकतात. अरब पक्षांना 19 जागा मिळू शकतात. त्यामुळे सत्तेत राहायचे असेल तर नेतान्याहू यांना अन्य पक्षांशी आघडी करावी लागणार आहे. आता नेतान्याहू आयसेनकोट यांनाही सत्तेत सामील करू शकतात. तशी शक्यता नेतान्याहू यांच्या जवळचे नेते व्यक्त करत आहेत. आयसेनकोट सोबत आल्यास नेतान्याहू यांना सुरुवातीची दोन वर्षे पंतप्रधानपद त्यानंतर आयसेनकोट यांना हे पद देण्यावर विचार केला जातोय. किंवा आयसेनकोट यांना महत्त्वाचे मंत्रिपद देऊन त्यांना सत्तेत महत्त्वाची भूमिका देण्यावरही विचार केला जातोय. दरम्यान, आयसेनकोट हे नेतान्याहू यांच्या विरोधात लढले. त्यामुळे सत्तेचं समीकरण कसं जुळून येणार, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान कसे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language