Hashtagintro

Jailer 2 OTT Release : रजनीकांत यांच्या 'जेलर 2'चा ओटीटीवर अनकट व्हर्जन येणार ! पण कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर ? जाणून घ्या

Jailer 2 OTT Release : सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दिग्दर्शक नेलसन दिलीपकुमार यांच्या या अ‍ॅक्शनपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रजनीकांत यांच्या जबरदस्त अ‍ॅक्शनसोबतच चित्रपटातील दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचीही चर्चा झाली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, ओटीटीवर प्रेक्षकांना चित्रपटाचा अनकट व्हर्जन पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘जेलर 2’च्या ओटीटी व्हर्जनमध्ये ३० मिनिटांचे अतिरिक्त फुटेज ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जेलर 2’चा थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला व्हर्जन आणि ओटीटीवर येणारा व्हर्जन यामध्ये फरक असू शकतो. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे जवळपास ३० मिनिटांचे अतिरिक्त फुटेज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त फुटेजमध्ये समांथा, मोहनलाल, ऋतिक रोशन आणि विजय सेतुपती यांच्या अधिक सीन्सचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. थिएटरमध्ये वेळेच्या मर्यादेमुळे वगळण्यात आलेले काही प्रसंग ओटीटी व्हर्जनमध्ये पाहायला मिळू शकतात. मात्र, या अतिरिक्त सीन्सबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
https://www.prahaar.in/2026/11/03/bollywood-newsafter-tiger-shroff-is-another-bollywood-actor-on-the-radar-of-the-lawrence-bishnoi-gang/
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज ?
‘जेलर 2’च्या डिजिटल रिलीजबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. १० नोव्हेंबरनंतर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रक्रिया होऊ शकते. मात्र, नेमकी रिलीज डेट आणि स्ट्रीमिंगची वेळ याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांना निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘जेलर 2’ची दमदार कमाई
‘जेलर 2’ने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाने जगभरात तब्बल ८१२ कोटी रुपयांचे कलेक्शन आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत समांथा, मोहनलाल, ऋतिक रोशन आणि विजय सेतुपती यांसारख्या कलाकारांची उपस्थिती हे मोठे आकर्षण ठरले. आता थिएटरमध्ये पाहता न आलेले अतिरिक्त सीन्स आणि अनकट व्हर्जन ओटीटीवर पाहण्याची संधी मिळणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘जेलर 2’च्या ओटीटी रिलीजची अधिकृत तारीख आणि अनकट व्हर्जनबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language