Hashtagintro

Pune Police : थेट पोलीस आयुक्तांचे निवासस्थान गाठले अन्…; पोलीस कर्मचाऱ्यानेच घातला गोंधळ, नेमकं काय घडलं?

पुणे: पुणे पोलीस दलात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदली न मिळाल्याच्या नाराजीतून आणि वरिष्ठांच्या कारभारावर असलेल्या रागातून एका पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन गोंधळ घातल्याची घटना घडली. संबंधित कर्मचाऱ्याने तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सुमारे अर्धा तास शिवीगाळ करत जाब विचारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/04/they-wont-let-us-live-in-panvel-a-mother-takes-an-extreme-step-along-with-her-two-children-due-to-a-debt-of-2-lakh-rupees/
निलंबनानंतर पुन्हा सेवेत रुजू
अमोल भिसे असे गोंधळ घातलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही कारणांमुळे त्याला यापूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. मात्र, त्याला अपेक्षित ठिकाणी बदली मिळाली नसल्याने तो नाराज होता, असे सांगण्यात येत आहे.

दारूच्या नशेत आयुक्तांच्या निवासस्थानी गोंधळ
बदलीच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या अमोल भिसेने दारूच्या नशेत पोलीस आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी धाव घेतली. तेथे त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेनंतर अमोल भिसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, पुणे पोलीस दलात या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language