Hashtagintro

Latur News : गुरदाळ तलावातील पाणी उपशावर कारवाई

Action taken against water withdrawal from Gurdal Lake

उदगीर, पुढारी वृत्तसेवा : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने गुरदाळ साठवण तलावातील अवैध पाणी उपशाविरोधात कारवाई केली. महसूल, पंचायत समिती आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत सुमारे २० विद्युत मोटारी, वायरचे बंडल आणि स्टार्टर बॉक्स असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.

गुरदाळ साठवण तलावातून काही व्यक्तींकडून अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, नागलगाव मंडळ अधिकारी करेप्पा साहेब आणि मंडळातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने तलाव परिसराची पाहणी केली.

यावेळी अवैध पाणी उपसा सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी, वायर आणि स्टार्टर बॉक्स जप्त करण्यात आले. हा मुद्देमाल ग्रामपंचायत अधिकारी, गुरदाळ यांच्या ताब्यात देण्यात आला. यंदा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता गुरदाळ तलावातील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी किंवा अन्य कारणांसाठी तलावातून अनधिकृत पाणी उपसा करू नये, असे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले. जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या सूचनेनुसार आणि उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये महसूल, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा अनधिकृत वापर खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language