Hashtagintro

Nashik Rural Health News | ग्रामीण आरोग्य सेवेत नाशिकची भरारी!

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (एनक्यूएस) राज्यस्तरीय मूल्यमापनात जिल्ह्यातील आणखी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि ६५ आयुष्यमान आरोग्य मंदिरांना (आरोग्य उपकेंद्रं) राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.

या नव्या यशामुळे जिल्ह्यातील गुणवत्ता प्रमाणित आरोग्य संस्थांची एकूण संख्या १०७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण १०७ मानांकित संस्थांमध्ये १६ प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि ९१ आरोग्य उपकेंद्रांचा समावेश आहे.

यापैकी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रं व १ उपकेंदराने यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळवले असून, १० प्राथमिक आरोग्य केंद्रं व १० उपकेंद्रं राज्यस्तरीय मानांकित ठरली आहेत.
नव्याने राज्यस्तरीय मानांकन मिळालेल्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कळवण तालुक्यातील तिन्हेळ (८७.४५ टक्के) केंद्राने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

त्याखालोखाल मुखेड-येवला (८६.९७ टक्के), बुबळी-सुरगाणा (८३.७५ टक्के), पाटोदा-येवला (८३.४७ टक्के), नांदूरी-कळवण (८२.०४ टक्के) आणि बोरगाव-सुरगाणा (८१.३० टक्के) या केंद्रांनी बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, डॉ. हर्षल नेहेते, डॉ. दीपक लोणे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हास्तरीय समन्वयक डॉ. निशिगंधा महाले आणि कृष्णा भोये यांच्या समन्वित प्रयत्नातून हे यश साध्य झाले आहे.

आदिवासी व दुर्गम भागातील उपकेंद्रांची चमक

  • दिंडोरी तालुका: ३१ उपकेंद्रें

  • सुरगाणा तालुका: २८ उपकेंद्रें

  • सिन्नर तालुका: ६ उपकेंद्रें

  • विशेष कामगिरी: पिंपळणारे (८९ टक्के), जोूळ, राजापूर आणि वलखेड (प्रत्येक ८८ टक्के). सुरगाण्यासारख्या आदिवासी व दुर्गम भागातील २८ उपकेंद्रांनी ८० ते ८७ टक्क्यांदरम्यान गुण मिळवून दर्जेदार सेवेचा प्रत्यय दिला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language