Hashtagintro

National Para Swimming Championship 2026: कोल्हापूरच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! पॅरा जलतरण स्पर्धेत पटकावली दोन सुवर्णपदके

National Para Swimming Championship 2026

कोल्हापूर : २६ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तिने स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला असून महाराष्ट्रासाठी पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मानही तिने मिळवला आहे.

१३ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. देशभरातील सुमारे ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत रियाने ५० मीटर आणि १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम केला होता. यंदा तिने स्वतःचाच हा विक्रम मोडून नवा इतिहास रचला आहे.

रियाची पदक कामगिरी

५० मीटर फ्री स्टाईल: सुवर्णपदक (वेळ – १ मिनिट २६.९७ सेकंद)

१०० मीटर फ्री स्टाईल: सुवर्णपदक (वेळ – ३ मिनिटे ०५ सेकंद)

५० मीटर बॅक स्ट्रोक: कांस्यपदक (वेळ – १ मिनिट ४०.९५ सेकंद)

कोल्हापूरच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी

रियाने गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आपल्या सुवर्णकामगिरीचे सातत्य टिकवून ठेवले आहे. यापूर्वी तिने २०२३ मध्ये गुवाहाटी येथे तीन सुवर्णपदकांसह ‘बेस्ट स्विमर’, २०२४ मध्ये गोवा येथे तीन सुवर्णपदके, तर २०२५ मध्ये हैदराबाद येथे तीन सुवर्णपदकांसह ‘ज्युनिअर प्लेअर ऑफ टुर्नामेंट’ हा बहुमान मिळवला होता.

रिया ही कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजची विद्यार्थिनी असून सदर बाजार येथील सागर पाटील जलतरण तलावावर ती सराव करते. तिला महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्सचे नंदकुमार नाले आणि कोल्हापूर पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशात आई रोहिणी आणि वडील सचिन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language