Hashtagintro

Nitesh Rane : हिंदू राष्ट्रात इस्लामीकरणाला थारा नको – मंत्री नितेश राणे;  हिंदूंना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : मुस्लिमांचा प्रजनन दर अधिक असल्याने येत्या काळात जगात मुस्लीम धर्मियांची लोकसंख्या जगभरात सर्वाधिक असेल, असा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अशावेळी हिंदू समाजाने सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज आहे. भारत हे हिंदू राष्ट्र असून या राष्ट्राला कोणत्याही प्रकारे इस्लामीकरणाचे गालबोट लागता कामा नये, याची काळजी हिंदू समाजाने घेतली पाहिजे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी केले. काही जण हिंदू-मुस्लीम राजकारणाचा आरोप करत असले, तरी जगभरात घडणाऱ्या घडामोडींची दखल हिंदू समाजाने घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/11/19/nagpur-major-ed-crackdown-on-sand-mafias-assets-worth-%e2%82%b916-23-crore-seized-transactions-worth-crores-carried-out-using-forged-e-tps-electronic-transport-permits/
जगभरात मुस्लिम धर्माची लोकसंख्या वाढून आगामी काळात तो सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म ठरेल, असा अहवाल प्रसिद्ध झाल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राणे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “गजवा-ए-हिंद असो किंवा गजवा-ए-आलम, विविध पद्धतीने संपूर्ण जगात इस्लाम पसरवणे आणि त्यासाठी जिहाद करणे, हे त्यांचे मूळ उद्दिष्ट आहे. त्यांच्या कुराणमध्ये हे लिहिलेले आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात. म्हणूनच आम्ही वारंवार हिंदू समाजाला सतर्क आणि जागृत करत आहोत. काही लोकांना वाटते की आम्ही हिंदू-मुस्लीम राजकारण करतो. मात्र, जगभरात मोठ्या प्रमाणात इस्लामीकरण सुरू असून प्रत्येकाला इस्लाम स्वीकारायला लावण्याचे प्रयत्न होत आहेत. मग ते जबरदस्तीने का असेनात, या गोष्टींची दखल हिंदू समाजाने घेतलीच पाहिजे, असे माझे मत आहे. आपला देश एक हिंदू राष्ट्र आहे. जगातील वेगवेगळ्या देशांनीही याबाबत दखल घ्यायला सुरुवात केली आहे. जगातील विविध देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष तुम्ही पाहत असाल. त्याचप्रमाणे आपला देश हिंदू राष्ट्र असल्याने या राष्ट्राला कोणत्याही पद्धतीने इस्लामीकरणाचे गालबोट लागता कामा नये, एवढी काळजी सर्व हिंदू समाजाने घेतली पाहिजे.”
दरम्यान, सायना एनसी यांनी बाळासाहेबांचे छायाचित्र फाडल्याप्रकरणी माफी मागितली असताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याबाबतही राणे यांना विचारण्यात आले. त्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हा सर्वांना नितांत आदर आहे. ते आमचे दैवत आहेत. मात्र, आता शायना एनसी यांनी माफी मागितलेली आहे. कोणताही कडवट शिवसैनिक अशा प्रकारची चूक मुद्दामहून कधीच करणार नाही. संजय राजाराम राऊत किंवा त्यांच्या उबाठा पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ज्या पद्धतीने प्रतारणा केली, त्यासाठी त्यांनी खरे तर ३०० ते ५०० दिवस माफी मागायला हवी. नाक रगडून माफी मागायला हवी. महाविकास आघाडीच्या काळात ‘हिंदूहृदयसम्राट’ हा शब्द लिहिण्यासही हे लोक घाबरायचे. त्यामुळे दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांना बदनाम करण्याचे आणि त्यांच्या विचारांच्या विरोधात वागण्याचे काम केल्याबद्दल संजय राजाराम राऊत यांनी किती वेळा माफी मागायला हवी, यावरही भूमिका मांडावी,” असे राणे म्हणाले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language