Hashtagintro

Pune Crime News : पुण्यात आणखी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पती ताब्यात, झांबरे पॅलेसची तोडफोड, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime News: पुण्यात 29 वर्षीय विवाहित आयटी इंजिनिअर पायल पवार-झांबरे यांचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी आणि सोन्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला ताब्यात घेतले असून पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी महर्षी नगर परिसरातील झांबरे पॅलेस येथे तोडफोड केल्याची माहिती आहे.
https://www.prahaar.in/2026/11/03/theft-of-transformers-and-welding-cables-in-the-tansa-dam-area/
पायल यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय?
पायल पवार-झांबरे या पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेसच्या मालकांच्या कुटुंबातील सून होत्या. त्यांचा मृतदेह मुकुंदनगरमधील अक्षय हाइट्स सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पायल यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
पायल यांचा लग्नापासून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. माहेरून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची आत्महत्या आणि घातपात या दोन्ही शक्यतांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

दिवाळीत सोन्याची मागणी केल्याचा आरोप
माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक दिवाळीत पायल यांच्याकडे 5 ते 10 तोळे सोन्याची मागणी केली जात होती. पायल यांचे माहेरचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढील हंगामापर्यंत वेळ मागितला होता. मात्र, त्यानंतरही पायल यांचा छळ सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पायल गर्भवती असताना मुलगाच व्हावा, यासाठी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. 30 मार्च 2023 रोजी पायल यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात वाद घातला आणि पायल किंवा बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पती पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे 7 वाजता सासरच्या मंडळींकडून पायल घरातून निघून गेल्याचे माहेरच्या लोकांना सांगण्यात आले. मात्र, नातेवाईक घटनास्थळी पोहोचले तेव्हा पायल मृतावस्थेत आढळल्या. त्यावेळी पती अक्षय आणि त्याचे आई-वडील घटनास्थळी नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पायल यांचे पती अक्षय झांबरे, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अक्षय याला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पायल यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी झांबरे पॅलेस येथे तोडफोड केली. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language