Rahul Gandhi Election Commission 2024 Lok Sabha elections : “२०२४ लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केले त्यांना निवडणूक आयोगाने एकतर ‘अस्तित्वात नसलेले मतदार’ किंवा ‘मतदान न केलेले लोक’ असे घोषित केले आहे. आता निवडणूक आयोग १४ कोटी मतदारांना अवैध ठरवत असेल, तर २०२४ लोकसभा निवडणूक वैध कशी असू शकते?”, असा सवाल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. १४) केला. हैदराबाद येथे आयोजित ‘भारत समिट’मध्ये ते बोलत होते.
१९२४ पासून भारतीय लोकशाहीच्या ऱ्हासाची सुरुवात
राहुल गांधी म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या १४ कोटी लोकांनी मतदान केले होते, त्यांना काही महिन्यांपूर्वी ‘अस्तित्वात नसलेले मतदार’ किंवा ‘मतदान न केलेले लोक’ असे घोषित करण्यात आले. निवडणूक आयोगाने १४ कोटी मतदारांना ‘अवैध’ किंवा ‘मतदान न केलेले’ ठरवले असेल, तर ती निवडणूक वैध कशी असू शकते?” भारतीय लोकशाहीच्या ऱ्हासाची सुरुवात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून झाली. या निवडणुकीमुळे देशाच्या निवडणूक प्रणालीमध्ये एक अभूतपूर्व बदल घडवून आणला गेला, असाही दावा त्यांनी केला.
#WATCH | Hyderabad, Telangana: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "… I can tell you already, with confidence, that we are going to defeat PM Modi and we are going to get rid of PM Modi. And you can see it, you can see it on our streets, you can see it in Delhi, you can see it in the fear that the Prime Minister and HM Amit Shah have. This is already a done deal."
— ANI (@ANI) November 14, 2026
पूर्वीची निवडणूक प्रणाली पूर्णपणे बदलली
“२०१४ मध्ये आपण एक पूर्णपणे नवीन प्रकारची निवडणूक पाहिली, जी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. राजकीय व्यवस्थेत कोट्यवधी डॉलर्स ओतले गेले.” या बदलामुळे पूर्वीची निवडणूक प्रणाली पूर्णपणे बदलली; ज्या प्रणालीमध्ये पूर्वी अटीतटीच्या लढती आणि आघाडी सरकारे (कोलिशन गव्हर्नमेंट्स) पाहायला मिळत असत. सुरुवातीला विरोधी पक्ष या बदलांमुळे पूर्णपणे थक्क झाले होते आणि त्यांना हे बदल समजून घेण्यासाठी जवळपास एक दशकाचा काळ लागला, असेही त्यांनी नमूद केले.
अदानी आणि मोदी यांच्यातील सीमारेषा पुसली गेली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी या दोघांमधील फरक पूर्णपणे पुसला गेला आहे. जागतिक संपत्ती क्रमवारीत अदानींच्या प्रगतीचा उल्लेख करत गांधी म्हणाले की, भाजप सत्तेत येण्यापूर्वी हा व्यावसायिक जगात साधारण ६०० व्या क्रमांकावर होता, परंतु नंतर तो जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. राजकारण आणि व्यवसाय यांच्या एकत्रीकरणामुळे व्यवसाय आणि राजकारण, तसेच अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील सीमारेषा आता पुसली गेली आहे. ती आता अस्तित्वातच नाही,” असा दावाही त्यांनी केला.
एका दशकात भाजपची संपत्ती अकरा पटीने वाढली
एका दशकात भाजपची संपत्ती अकरा पटीने वाढली आहे. त्यांनी पक्षाच्या या आर्थिक वाढीचा संबंध राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाशी जोडला, असा आरोप करत काँग्रेसला सत्ताधारी पक्षाचा सामना करण्यात अडचणी आल्या, कारण त्यांचे राजकीय संवादाचे पारंपरिक मार्ग आता प्रभावी ठरत नव्हते, असे सांगत विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींचा पराभव करेल. भाजप नेतृत्वावर असलेला दबाव आता अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेस पंतप्रधान मोदींना सत्तेतून हटवण्यासाठी दृढनिश्चयी आहे आणि हा निकाल निश्चित आहे, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
Source: Pudhari News
