Hashtagintro

Revolutionary Goans Party leadership controversy | आपला गटच खरा 'आरजी'; खोलकरांचा दावा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचा (आरजी) खजिनदार म्हणून आपण निवडणूक आयोगाकडे सादर केलेला अहवाल आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केला आहे. त्यामुळे आपलाच आरजी पक्ष खरा असल्याचा दावा आरजी (खोलकर) गटाचे खजिनदार अजय खोलकर यांनी शुक्रवारी केला.

आपला दावा स्पष्ट करताना खोलकर म्हणाले की, १३ सप्टेंबर रोजी स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवणारे आमदार वीरश बोरकर यांनी आपल्याला पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही ३० सप्टेंबर रोजी आपण राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. हा अहवाल ११ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे जर आपल्याला पक्षातून काढून टाकण्यात आले होते, तर निवडणूक आयोगाने आपल्या स्वाक्षरीची कागदपत्रे कशी स्वीकारली, याचे स्पष्टीकरण आमदार बोरकर यांनी द्यावे, अशी मागणी खोलकर यांनी केली.

आमदार बोरकर यांची २०२१ मध्ये आरजीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती कोणी केली होती, तसेच २०२५-२६ मधील त्यांच्या नियुक्तीची कागदपत्रेही त्यांनी सार्वजनिक करावीत, असे आव्हान खोलकर यांनी दिले. स्वीकारण्यात आला, तर २१ ऑक्टोबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला.

पक्षाचे बँक खाते आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बोरकर यांना कोणताही अधिकार नसल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर बोरकर यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आयोग पक्षपाती असल्याचे दिसते: आमदार बोरकर

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या (बोरकर गट) अध्यक्षा म्हणून शविना नाईक-शिरोडकर यांना स्वाक्षरी करण्यास नकार देण्यात आला. या प्रकारातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार वरिश बोरकर यांनी केला. राज्य निवडणूक अधिकारी पक्षपाती नसावेत. मात्र, त्यांचे वर्तन पाहता ते विरोधी गटाला पाठबळ देत असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने तटस्थ भूमिका घेतली पाहिजे, असे बोरकर म्हणाले. आपल्या पक्षाचे संघटनात्मक काम सुरू असून काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे सत्ताधारी भाजप घाबरला आहे. त्यामुळे विरोधी गटाचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, लोकांनी घाबरून जाऊ नये. यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language