Hashtagintro

U19 Asia Cup 2026: बांगलादेशला नमवून पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत, भारताशी सामना होणार!

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. या लढतीत पाकिस्तानने बाजी मारली आणि अंतिम फेरी गाठली आहे. नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला होता, पण प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय मात्र चुकला. बांगलादेशचा संघ 31.4 षटकात सर्व गडी गमवून 138 धावा करू शकला. यासह पाकिस्तानसमोर विजयासाठी 139 धावांचं सोपं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानने सहज गाठलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बांगलादेशकडून अब्दुल्ला अल मुही सोडला तर एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. तर पाकिस्तानच्या रिझवानुल्लाने बांगलादेशचा निम्मा संघ बाद केला. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी कमी धावा आल्या आणि विजयाचा मार्ग सोपा झाला. आता अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता वाढली आहे. कारण अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी 228 धावांचं लक्ष्य ठेवलं.
बांगलादेशचा डाव
बांगलादेशकडून अब्दुल्ला अल मुही आणि एसके जरिफ सियाम ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 4 धावा असताना एसके जरीफ सियाम बाद झाला. कावसेर अहमद 9, मोहम्मद फरीद हसन फैसल 17 आणि अहसान अल मुमिन 1 धाव करून तंबूत परतले. पण एका बाजूने अब्दुल्ला अल मुहीने झुंज सुरू ठेवली आणि 45 चेंडूत 50 धावांची खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशचा डाव गडगडला. अल रफी 20, रकीबुल होसन 26, रोबिउल हसन अनिक 0, रुबे इस्लाम रिझोन 0, शेख अतीकुर रहमान 1 धाव करून बाद झाले. तफीउल आलम तमीम हा 2 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानच्या रिझवानुल्ला 8 षटकं टाकली आणि 30 धावा देत 5 विकेट काढल्या. तर मोहम्मद सय्यमने 2, अली रझाने 1 आणि अहमद हुस्सैनने 1 विकेट काढली.
पाकिस्तानचा डाव
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग पाकिस्तानने सहज केला. पाकिस्तानच्या उस्मान खान आणि हयाम खान यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. या जोडीच्या भागीदारीमुळे पाकिस्तानचा विजय निश्चित झाला. हयाम खानने 72 चेंडूत 69 धावांची खेळी केली आणि बाद झाला. पण तिथपर्यंत पाकिस्तानचा विजय निश्चित झाला होता. उस्मान खानने 54 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या. तर अब्दुल कादीरने 5 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 8 धावांची नाबाद खेळी आणि संघाला विजय मिळवून दिला.

https://www.prahaar.in/2026/11/12/team-india-flight-took-a-full-26-minutes-to-land-players-left-anxious-in-wellington-new-zealand-what-exactly-happened/
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान U19 (प्लेइंग इलेव्हन): उस्मान खान, अब्दुल कादिर, फरहान युसफ (कर्णधार), अहमद हुसैन, अली रझा, हमजा जहूर (विकेटकीपर), हसनैन अब्बास दार, मोहम्मद सय्यम, रिझवानुल्ला, निकाब शफीक, हायम खान.

बांगलादेश U19 (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला अल मुही, एसके जरिफ सियाम, ऑल रफी, कावसेर अहमद, अहसान अल मुमिन, मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर/कर्णधार), रकीबुल होसन, रोबिउल हसन अनिक, रुबे इस्लाम रिझोन, तफीउल आलम तमीम, शेख अतीकुर रहमान.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language