
आपल्याकडे भेंडी म्हणजे एक लेडी फिंगर किंवा साधी भेंडी ही खाणे फायदेशीर असतेच पण याव्यतिरीक्त पावसाळ्याच्या शेवटीच उपलब्ध होणारी कोटे भेंडी आरोग्यासाठी खूपच उपयोगी असते

काटे भेंडी Wild Okra ही मुरमाड जमिनीत चांगल्याप्रकारे उगवते या भेंडीवर बारीक बारीक काटे असतात. याची आमटी अतिशय चविष्ट असते वर्षातील काही महिनेच ही खाण्यास मिळते

ही भाजी प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान (पावसाळ्याच्या मध्यात ते पावसाळा संपून हिवाळा सुरू होईपर्यंत) उपलब्ध होते.

शेतांचे बांध, माळरानत वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढते. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात स्थानिक शेतकरी किंवा आदिवासी बांधव ही भाजी विक्रीसाठी आणतात.

भाजीसाठी काटे भेंडीची केवळ कोवळी मध्यम फळे वापरली जातात; भेंडी अतिशय जून झाल्यावर त्यावरील काटे कडक होतात आणि ते खाण्यायोग्य राहत नाही.

पचनक्रिया सुधारते: यात मुबलक प्रमाणात विद्राव्य फायबर आणि नैसर्गिक बुळबुळीतपणा असतो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होऊन आतड्यांचे आरोग्य सुधारते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत: फायबरमुळे शरीरात कार्बोहायड्रेट्स हळूहळू शोषले जातात, ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी एकदम वाढत नाही.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: व्हिटॅमिन ‘C’ आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने हंगामी आजार, खोकला आणि संसर्गाविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते.

हाडांचे बळकटीकरण: यामध्ये व्हिटॅमिन ‘K’, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.

यातील अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
Source: Pudhari News
