Hashtagintro

भारताने न्यूझीलंडला 3-2 ने पराभवाची धूळ चारली, शताब्दी हॉकी मालिकेत टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक क्रीडा संबंधांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑकलंडमध्ये विशेष हॉकी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन सामन्यांच्या ‘न्यूझीलंड विरुद्ध भारत 2026 शताब्दी हॉकी मालिके’त भारतीय पुरुष हॉकी संघाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 3-2 ने धुव्वा उडवला. भारताकडून उत्तम सिंग, शारदानंद तिवारी आणि संजय राणा यांनी गोल केले. तर न्यूझीलंडकडून जॉन्टी एल्म्स आणि सॅम हिहा यांनी गोल केले. ऑकलंडमधील लॉईड एल्स्मोर हॉकी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या चुरशीच्या सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारत न्यूझीलंड सामन्यात काय झालं?
न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा गोल आघाडी घेतली होती. 25व्या मिनिटाला जॉन्टी एल्म्सने गोल मारत भारतीय संघावर दबाव वाढवण्याच प्रयत्न केला. पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण अवघ्या काही सेकंदात भारताने प्रत्युत्तर दिलं, उत्तम सिंगने मैदानी गोल मारला आणि 1-1 अशी बरोबरी साधील. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ केला. 38 व्या मिनिटाला शारदानंद तिवारीने गोल मारत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानतर कर्णधार संजय राणा याने 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं आणि 3-1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी मोडू काढण्याचा न्यूझीलंडने प्रयत्न केला. 55 व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या सॅम हिहाने गोल मारत अंतर एका गोलने कमी केलं. पण शेवटच्या टप्प्यात गोल बरोबरी करण्यात अपयश आलं. त्यामुळे भारताने हा सामना 3-2 ने जिंकला.

A WINNING START FOR INDIA! 🇮🇳🔥
The Indian Men’s Hockey Team opened their campaign at the 2026 India/New Zealand Century of Sporting Unity Event with an impressive 3-2 victory over hosts New Zealand! 👏

A strong start to the three-match series in Auckland! 🏑🤝🇮🇳

#HockeyIndia #IndiaKaGame #INDvNZ

— Hockey India (@TheHockeyIndia) November 19, 2026

https://www.prahaar.in/2026/11/19/pat-cummins-finds-it-difficult-to-step-out-of-his-home-following-cameron-bancroft-allegations-faces-a-barrage-of-questions-from-journalists/
काय आहे या शताब्दी मालिकेचा इतिहास?
1926 मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्यासह भारतीय हॉकी संघाने पहिल्यांदाच न्यूझीलंडचा ऐतिहासिक दौरा केला होता. न्यूझीलंडच्या भूमीवर पाऊल ठेवणारा पहिलाच भारतीय क्रीडा संघ होता. या ऐतिहासिक घटनेला 2026 मध्ये बरोबर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली शतकपूर्तीचे औचित्य साधत न्यूझीलंड हॉकी बोर्डाकडून विशेष मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘2026 भारत-न्यूझीलंड सेंच्युरी ऑफ स्पोर्टिंग युनिटी इव्हेंट’ असे या स्पर्धेचे अधिकृत नाव असून, ही निमंत्रित स्पर्धा असल्याने या सामन्यांची गणना अधिकृत सामने म्हणून केली जाणार नाही.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language