Hashtagintro

Modi Kahin Nahi Jayega : ‘मोदी कहीं नहीं जायेगा’! प्रचारगीत बनवून भाजपचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना प्रत्युत्तर

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खर्गेे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सोशल मीडियावर एक विशेष मोहीम सुरू केली आहे. यासाठी भाजपने ‘मोदी कहीं नहीं जायेगा’ या शीर्षकाचे एक प्रचारगीत प्रसिद्ध केले असून, पंतप्रधानांना जनतेचा भक्कम पाठिंबा असल्याचे यात म्हटले आहे. संबित पात्रा, पीयूष गोयल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यासारख्या अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांनी हा व्हिडीओ आपापल्या सोशल मीडिया खात्यांवर शेअर केला आहे.

पाटणा येथील एका कार्यक्रमादरम्यान श्रोत्यांमधून ‘मोदी कुठेही जाणार नाहीत,’ असा आवाज आल्यानंतर खर्गेे यांनी त्यावर ‘मोदी का बापभी जायेगा,’ अशी टिपणी केली होती. या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या गाण्यात विरोधकांकडून पंतप्रधानांवर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा निषेध करण्यात आला असून वाघ कधी झुकत नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेसचे ‘मत चोरी’च्या मुद्द्यावरून प्रत्युत्तर

दुसरीकडे, काँग्रेसनेही भाजपविरुद्ध डिजिटल मोहीम तीव्र केली आहे. काँग्रेसने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘मत चोरी’चा (निवडणूक गैरव्यवहार) आरोप लावला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील पुरावे जनतेसमोर मांडल्याचा दावा करत दोषींना कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही, असे म्हटले आहे. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यापूर्वी हा राजकीय वाद शिगेला पोहोचला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language